
टेनिस विश्वात आपल्या ग्लॅमरस अदांसाठी ओळखली जाणारी युजीन बुचार्ड लवकरच भारतात येणार आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या चेन्नई ओपन 2022 साठी युजीनला वाइल्ड कार्ड एंट्री देण्यात आली आहे.

बुचार्ड फक्त भारतातच नाही, तर जगभरात आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

बुचार्डला मागच्यावर्षी मॅक्सिको मध्ये झालेल्या डब्ल्यूटीएफ टुर्नामेंट मध्ये दुखापत झाली होती. तिच्या खांद्याला दुखापत झाली होती.

त्यानंतर कॅनडा मध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेतून तिने टेनिस कोर्टावर पुनरागमन केलं. ती चेन्नई ओपन मध्ये खेळताना दिसणार आहे.

ग्रँड स्लॅम स्पर्धेची फायनल खेळणारी युजीन बुचार्ड कॅनडाची पहिली महिला टेनिसपटू आहे.

2014 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच्या सेमीफायनल मध्ये पोहोचली होती. 2014 मध्ये बुचार्डने क्रमवारीत 5 व्या स्थानापर्यंत धडक मारली होती.

2018 साली एका फॅन बरोबर डेटवर गेल्यामुळे ती चर्चेत आली हेती. युजीनने टि्वटरवर फॅन सोबत एक पैज लावली होती. ती पैज ती हरली.

त्यानंतर तिला चाहत्यासोबत एनबीए मॅच पहाण्यासाठी जावं लागलं. तिने तो फोटोही सोशल मीडियावर शेयर केला होता.

युजीन WTA रँकिंगमध्ये पाचव्या स्थानापर्यंत पोहोचली होती. 2014 साली ती विम्बलडच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी तिला चेक रिपब्लिच्या पेट्रा क्वितोवाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

बुचार्ड त्याच वर्षी म्हणजे 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली होती.