यंदाही डहाणू तालुक्यातील चिंचणी तसेच तारापूर परिसरात युरोपियन कलहंस पक्षाचे आगमन झाले आहे.
गेल्यावर्षी 18 नोव्हेंबरला युरोपियन कलहंसाचे दर्शन झाले होते. त्यावेळी केवळ या पक्षाची एकच जोडी दिसली होती.
दरम्यान चार-पाच दिवसांपासून चिंचणी आणि तारापूर येथील श्रीकृष्ण तलाव, कलोवली येथील खाडी परिसरात या पक्षांचे थव्याने दर्शन होत आहे.
यंदा या पक्षांची संख्या वाढली आहे, असे माहिती अनेक पक्षीप्रेमी देत आहे.
हे पक्षी जिल्ह्यातील 110 किमीच्या सागरी किनारपट्टी आणि खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर दिसतात
दरम्यान या पक्षांना मुक्त संचार आणि शिकारीचा धोका टाळण्यासाठी वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.
पाहा काही फोटो