Photo | माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Follow us

कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट होत असताना राजीव आवळे यांच्यासारखा अनुभवी, लोकांना हवाहवासा वाटणारा नेता पक्षात येत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आवळे यांचे पक्षात स्वागत केले.
आवळे यांची कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला बळकटी देण्यासाठी मोलाची मदत होईल, तसेच पक्षातील मातंग आणि बहुजन समाजाला आवळे यांच्या पक्षप्रवेशाने एक उत्त्म नेतृत्व मिळाले असल्याची भावना यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली.
तसेच आवळे यांच्यासोबत पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपण आगीतून फुफाट्यात आलो असा विचार कधीच करु नये, असेही अजितदादा म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी पूर्ण ताकदीनिशी काम करेन. पक्षसंघटना वाढीसाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास मी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आवळे यांनी दिली.
राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगर परिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता आवळे, वडगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष लता सूर्यवंशी, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे डॉ. प्रफुल्ल असुरलेकर, डॅरल डिसुझा, मॅलेट परेरा, अनिल भोसले, भारतीय लहुजी पँथरचे प्रदेश संघटक युवराज दाखले यांचादेखील प्रवेश झाला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे उपस्थित होते.