अभिनेता अभिमन्यू दासानी आज मुंबईत एका मुलीसोबत फिरताना दिसला.
ही मुलगी कोण आहे, ती अभिनेत्री आहे की त्याची मैत्रिण आहे शिवाय तिचा फिल्म इंडस्ट्रीशी काही संबंध आहे का हे सध्या कुणाला माहित नाही.
दोघांनीही मास्क कॅरी केले होते. मुंबईतील लॉकडाउनमुळे यावेळी सर्व जिम बंद आहेत. तर फिट राहण्यासाठी सकाळी चालणं हाच एक पर्याय आहे.
अभिमन्यूने फोटोग्राफर्सला बघून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
'मर्द को दर्द नहीं होता' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आणि अभिनेत्री भाग्यश्री यांचा मुलगा अभिमन्यू दासानीनं पहिल्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती.
अभिमन्यू अशा तरूण कलाकारांपैकी एक आहे ज्यांनी अभिनयाबरोबरच अॅक्शनच्या दूनियेतही आपलं नावे नोंदवलं आहेत. माचो बॉडी आणि अॅक्शन मास्टर अभिमन्यु दासानी बॉलीवूडमधील बिझी कलाकारांपैकी एक आहे. 2021 मध्ये त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.