Fahmaan Sumbul | ‘या’ व्यक्तीमुळे आला फहमान खान आणि सुंबुल तौकीर यांच्या मैत्रीमध्ये दुरावा, अभिनेत्याने केला मोठा खुलासा
सुंबुल तौकीर हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सुंबुल तौकीर हिला खरी ओळखही इमली मालिकेतून मिळालीये. या मालिकेनंतर सुंबुल तौकीर ही थेट बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाली. धमाकेदार गेम खेळताना सुंबुल तौकीर ही यावेळी दिसली.
1 / 5
सुंबुल ताैकीर ही खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली. मात्र, आता हे स्पष्ट झाले आहे की, सुंबुल ही खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होणार नाहीये. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुंबुल ताैकीर ही तिच्या आणि फहमानच्या मैत्रीमुळे चर्चेत आहे.
2 / 5
फहमान आणि सुंबुल ताैकीर यांची जोडी इमली मालिकेत बघायला मिळाली होती. रिअल लाईफमध्येही हे दोघे खूप जास्त चांगले मित्र आहेत. सुंबुल ताैकीर हिला सपोर्ट करण्यासाठी फहमान हा बिग बाॅसमध्येही सहभागी झाला होता. मात्र, यांच्या मैत्रीमध्ये दरार पडल्याची चर्चा सतत रंगत आहे.
3 / 5
सुंबुल ताैकीर आणि फहमान यांच्यामध्ये काहीतरी वाद झाल्याची चर्चा होती. एका मुलाखतीमध्ये बोलताना फहमान याने यावर अत्यंत मोठे भाष्य करत म्हटले की, मी सुंबुल ताैकीर हिच्या घरी बऱ्याच वेळा फोन केले, तिघांनाही काॅल केले पण माझे काॅल कोणीच रिसिव्ह केले नाहीये.
4 / 5
माझे काॅल रिसिव्ह केले जात नसल्याने मी खूप जास्त निराश झालो. या मुलाखतीमध्ये बोलताना फहमान याने सुंबुल ताैकीर हिच्या वडिलांमुळेच आमच्या मैत्रीमध्ये दरार आल्याचा देखील दावा केला. मात्र, सुंबुल ताैकीर आणि फहमान यांच्यात वाद नेमका का झाला हे कळू शकले नाहीये.
5 / 5
सुंबुल ताैकीर आणि फहमान यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त अशी आवडली. मात्र, यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आल्याचे कळताच चाहते निराश झाल्याचे बघायला मिळत आहे. अनेकांनी तर थेट सुंबुल ताैकीर हिच्या वडिलांना सोशल मीडियावर टार्गेट करण्यास देखील सुरूवात केली आहे.