
टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे चँपियन आज भारतात आले. चाहत्यांनी एअरपोर्टवर त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. चाहत्यांचं प्रेम पाहून खेळाडूही भारावले. रोहितने वर्ल्डकप उंचावून दाखवाताच एअरपोर्टचा परिसर दणाणून गेला.

एक चाहता दिसला ज्याच्या छातीवर विराट कोहलीचा फोटो होता. आणि त्याने त्याच्या पाठीवर खेळाडूंच्या नावाचे टॅटू गोंदवले होते. या चाहत्यांच्या हातात तिरंगा दिसत होता. टीम इंडियाच्या खेळाडूंना विमानतळावर चाहत्यांनी पाहताच त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

एअरपोर्टवर आलेल्या आणखी एका चाहत्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच स्टार खेळाडू विराट कोहली याचे सुंदर चित्र स्वत:च्या हाताने काढून आणले होते. तर धोनी आणि टीम इंडियाचा एक खास चाहताही विमानतळावर दिसला, जो जवळपास 16 वर्षांपासून टीम इंडियाला सपोर्ट करत आहे. मुंबईत होणाऱ्या भारतीय संघाच्या विजय परेडमध्येही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टीम इंडिया आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये उतरली असून तेथे विराटचे कुटुंबीयही होते. विराट आणि त्याच्या फॅमिलीचा फोटोही वेगाने व्हायरल होत आहे.

ITC मौर्या हॉटेलच्या शेफ्सनी वर्ल्ड चॅम्पियन टीमच्या स्वागतासाठी खास केक तयार केला. हा केक टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगात आहे. तसेच त्यावर वर्ल्डकपच्या ट्रॉफीची प्रतिकृती देखील साकारण्यात आली.