Photo Gallery : शेतकऱ्यांच्या आंदोलनात पथनाट्य, आता तरी मिळेल का न्याय?
अमरावती : लोकशाहीमध्ये न्याय मागण्याचा हक्क हा सर्वांनाच आहे. याकरिता आंदोलन, मोर्चे हे पर्याय असूनही प्रशासानाला घाम फुटत नाही. असाच काहीसा प्रकार विदर्भातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे. 2013 च्या कायद्यानुसार प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. याकरिता विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर मागील 12 दिवसांपासून लाक्षणीय प्राणांतिक महाउपोषण सुरू आहे. असे असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पथनाट्यातून शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
Most Read Stories