दिवसा अन् सुरळीत विद्युत पुरवठा: ऐन रब्बी हंगामात महावितरणकडून विद्युत पुरवठ्याचे वेळापत्रक हे जाहीर केले जाते. शिवाय हे शेतकऱ्यांच्या सोईचे नसल्याने असंख्य अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या 8 तास अन् तोही अनियमित वीज पुरवठा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सलग 10 तास आणि तोही दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
रात्रीच्या वेळी जीव धोक्यात : रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी सध्या रात्रीचा दिवस करीत आहे. असे असले तरी रात्री वन्यजीव आणि जंगली प्राण्यांमुळे जीव मुठीत घेऊन शेतीकामे करावी लागत आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु असूनही या वेळापत्रकात कोणताच बदल केलेला नाही.
घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त: यापूर्वी सांगली आणि कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध आंदोलने सुरु आहेत. शुक्रवारी इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. कोणता गैरप्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र, आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मागण्या मान्य नाहीत तोपर्यंत आंदोलनाचे अस्त्र: शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कायम सरकारचे दुर्लक्ष राहिलेले आहे. रब्बी हंगामातील उत्पादकता वाढवण्यासाठी पाण्याची गरज आहे. सध्या मुबलक प्रमाणात पाणी असतानाही केवळ विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लगल्या होत्या. आंदोलन सुरु असूनही महावितरण कोणतीच भूमिका घेत नसल्याने आता वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने सुरु होत आहेत.