मराठी चित्रपट सृष्टीतील 'वाघ' म्हणजेच अमेय वाघचा आज वाढदिवस आहे.
'फास्टर फेणे', 'गर्लफ्रेन्ड', 'कास्टिग काऊच' यासारख्या चित्रपट आणि कार्यक्रमांमधून अमेय प्रत्येक मराठी घरांमध्ये पोहचला आहे.
वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरनं त्याला इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
कास्टिंग काऊचची सुपरहिट जोडी म्हणजेच अमेय वाघ आणि निपून धर्माधिकारी. निपूननंसुद्धा अमेयला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णीनंसुद्धा अमेयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.