आज देशभरात करवा चौथ साजरा केला जातोय. लग्नानंतर नवऱ्याच्या दिर्घाआयुष्यासाठी हा सण साजरा केला जातो. अभिनेत्री काम्या पंजाबीचा हा पहिलाच करवा चौथ आहे. त्यामुळे तिच्यासाठी आजचा दिवस जास्त स्पेशल आहे.
मात्र तिचा हा स्पेशल सण तिच्या नवऱ्याने अधिकच स्पेशल बनवला आहे. तिचा नवरा शलभ दांगनं तिच्या हातावर मेहंदी काढून दिली. हे रोमॅन्टिक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअरसुद्धा केले आहेत.
एका मुलाखतीदरम्यान काम्यानं करवा चौथसाठी खूप उत्सुक असल्याचं सांगितलं होतं. यावर्षी सगळ्या प्रथा फॉलो करणार असल्याचंही ती म्हणाली होती. शिवाय शलभसाठी सरप्राईज प्लॅन केल्याचंही तिनं सांगितलं.
करवा चौथनिमित्त तिनं एका मोठ्या पूजेचं आयोजन केलं आहे.
यावर्षीच म्हणजे 10 फेब्रुवारी 2020 ला काम्या आणि शलभ विवाह बंधनात अडकले होते.