48 वर्षीय मंदिरा बेदी स्वतःला फिट ठेवण्यासाठी डाएटबरोबरच कठीण वर्कआऊटही करते
मंदिराला आजही बॉलिवूडची फिटनेस आयकॉन म्हटलं जातं. ती सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, ब्रेड आणि कॉफी घेणं पसंत करते.
मंदिरा सकाळी उठल्यावर आधी ब्लॅक कॉफीमध्ये एक चमचा नारळाचं तेल टाकून पिते.
सकाळची कॉफी प्यायल्यानंतर ती अॅपल साईडर वेनेगर पिते.
पूर्ण दिवस फ्रेश राहण्यासाठी ती सकाळी व्यायाम करण्यास पसंती देते.
मंदिरा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात घरचं जेवण म्हणजेच दाळ , भात भाजी चपाती खाण्यास पसंती देते .
तिचं रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 7 ते 8 च्या वेळेत होते.
ती विशेष म्हणजे प्रोटीन्सवर लक्ष केंद्रीत करते .
मंदिरा फिटनेस निगडीत गोष्टी तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.