प्रसिद्ध अभिनेता नितेश पांडे यांचेही आकस्मिक निधन झाले. वयाच्या 51 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालं. नाशिकजवळील इगतपुरी याठिकाणी पहाटे 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शूटनिमित्त ते तिथे गेले होते. कार्डिॲक अरेस्ट इतका तीव्र होता की नितेश यांनी जागीच प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे. ते अनुपमा या लोकिप्रिय मालिकेत धीरज कुमार यांची भूमिका साकारत होते.