Photo Gallery | आहारातील पुदिन्याच्या सेवनाचे पाच आश्चर्यकारक फायदे
पुदिना स्नायूंना आराम देण्याचे काम करत असते. तसेच स्नायूमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करतात. याबरोबरच दिनाचा रस कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.
1 / 5
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पुदिनामध्ये अँटीऑक्सिडंट्स, मेन्थॉल आणि फायटोन्युट्रिएंट्स भरपूर असतात. यामुळे अन्न पचवण्यासाठी मदत होते. पुदिनाच्या समावेशामुळे पोटातील आम्लता व पोट फुगणे कमी होण्यास मदत होते.
2 / 5
पुदिना स्नायूंना आराम देण्याचे काम करत असते. तसेच स्नायूमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करतात. याबरोबरच दिनाचा रस कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.
3 / 5
पुदिना सेवनामुळे तणाव आणि नैराश्या कमी होण्यास मदत होते. पुदिना औषधी वनस्पस्ती आहे. पुदिनामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. जे त्वचेवरील मुरुम आणि मुरुमांवर उपचार करण्यास मदत करतात.
4 / 5
पुदिनाच्या पानांमध्ये सॅलिसिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. पुदिनामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातून फ्री-रॅडिकल्स काढून स्वच्छ व तजेलदार त्वचा बनवण्यास मदत करतात.
5 / 5
पुदिनाची पाने चघळल्याने दाताचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर माउथवॉश म्हणून वापरल्याने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होऊन हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते.
या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर अवलंबून आहे. )