Royal Enfield सह भारतातील पाच बेस्ट क्रुझर बाइक, जाणून घ्या सर्वकाही
क्रुझर बाइकबाबत तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या गाडीचा थाटच काही वेगळा असतो. त्यामुळे आपल्याकडे क्रुझर बाइक असावी असं कायम वाटतं. क्रुझर बाइकमध्ये रॉयल एनफिल्डसह बजाजच्या बाइकचा समावेश आहे.
1 / 5
Bajaj Avenger Cruise 220: उंच विंडशील्ड आणि कमी स्लंग सीट असलेली क्लासिक क्रूझर बाइक आहे. बाइकमध्ये 220cc, सिंगल-सिलेंडर एअर आणि ऑइल-कूल्ड DTS-i इंजिन आहे. हे इंजिन 19bhp आणि 17.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही गाडी 53 kmpl चा मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. क्रूझर बाइक सिंगल-चॅनल एबीएसने सुसज्ज आहे. या बाइकची किंमत 1,38,999 रुपये आहे. (फोटो:Bajaj)
2 / 5
Jawa standard: जावाने या बाइकचे इंजिन महिंद्रा मोजोकडून घेतले आहे. पण रेट्रो-शैली क्रूझरसारखी दिसण्यासाठी वेगळ्या पद्धतीने ट्यून केलेले आहे. Jawa 300 ड्युअल-चॅनल आणि सिंगल-चॅनेल ABS ने सुसज्ज आहे. 294.72 इंजिन असून कमाल पॉवर 20.1kW आहे. हे इंजिन 26.84Nm टॉर्क जनरेट करते. या गाडीची किंमत 1,83,648 रुपये आहे. (फोटो: Jawa )
3 / 5
Jawa Perak: जावा पेरकमध्ये सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, 343cc इंजिन आहे. हे इंजिन 30bhp आणि 31Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाइकची किंमत 2,11,368 रुपये आहे. (फोटो:Jawa )
4 / 5
Royal Enfield Bullet 350: बुलेट 350 ही भारतातील सर्वोत्तम क्रूझरपैकी एक आहे. 346cc सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनमधून 19.8bhp आणि 28Nm टॉर्क जनरेट करते. या गाडीची किंमत 1,50,893 रुपये आहे. (फोटो: Royal Enfield )
5 / 5
Jawa 42: ड्युअल-चॅनल आणि सिंगल-चॅनेल ABS सह सुसज्ज आहे. यात 294.72CC इंजिन असून 26.84 Nm टॉर्क जनरेट करते. बाइक 1369mn च्या व्हीलबेससह येते. या गाडीची किंमत 1,74,573 रुपये आहे. (फोटो:Jawa )