Upcoming SUV: टाटापासून होंडा कंपनीच्या या वर्षी 5 नवीन SUV होणार लाँच, जाणून
Upcoming SUV cars in India : मिडसाईज एसयुव्ही सेगमेंटमध्ये या वर्षी पाच जबरदस्त गाड्या लाँच होणार आहे. टाटा, होंडासह किया सारखा ब्रँड एसयुव्ही सादर करणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत
1 / 5
Citroen C3 Aircross: सिट्रॉन सी 3 एअरक्रॉसचा ग्लोबल प्रीमियर या महिन्याच्या शेवटी होईल. भारतात आगामी कारची विक्री 2023 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिट्रॉनची नवीन एसयुव्ही पाच आणि सात सीटर पर्यायांसह सादर केली जाऊ शकते. (प्रातिनिधीक फोटो : Citroen)
2 / 5
Honda Midsize SUV : होंडा भारतात नवीन मध्यम आकाराची एसयुव्ही लाँच करण्याचा विचार करत आहे. आगामी 5 सीटर एसयुव्ही जुलै किंवा ऑगस्ट दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते. या गाडीचं डिझाईन होंडाच्या ग्लोबल एसयूव्ही सारखी असेल. (प्रातिनिधीक फोटो: Honda)
3 / 5
Kia Seltos Facelift : किया सेल्टोसच्या फेसलिफ्ट मॉडेलची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आगामी मॉडेल नवीन अपडेट्ससह सादर केले जाऊ शकते. सध्या या कारचा समावेश देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मध्यम आकाराच्या एसयूव्हीमध्ये झाला आहे. (प्रातिनिधीक फोटो: Kia)
4 / 5
Tata Harrier Facelift: Tata Harrier चे अपडेटेड मॉडेल देखील लवकरच लाँच केले जाऊ शकते. टाटाच्या लोकप्रिय कारचे फेसलिफ्टेड व्हर्जन अनेक अपडेट्ससह सादर केले जाईल. कंपनी त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जनही लाँच करण्याच्या तयारीत आहे. (प्रातिनिधीक फोटो: टाटा)
5 / 5
टाटा मोटर्स सफारी एसयूव्हीची फेसलिफ्ट आवृत्ती देखील सादर करू शकते. टाटा सफारीला भारतात खूप पसंती दिली जात आहे. आता फेसलिफ्ट आवृत्तीच्या आगमनानंतर त्याच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. (प्रातिनिधीक फोटो: टाटा)