Success Story : पाच इंजिनिअर, लाखोंचा पॅकेज सोडून झाले IAS-IPS
Success Story : भारतीय संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आयएएस अन् आयपीएस होण्याचे स्वप्न अनेकांचे असते. परंतु खासगी कंपन्यांमध्ये लाखो रुपयांचे पॅकेज असताना त्या लोकांनी नोकरी सोडली अन् युपीएससीची बिकट वाट धरली. त्यात त्यांना यश आले.
1 / 5
रोबिन बंसल : रोबिन बंसल यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 135वी रँक मिळाली. पंजाबमधील संगरुल जिल्ह्यातील असलेले रोबिन यांनी दिल्ली आयआयटीमधून बीटेक केले. त्यानंतर एका खासगी कंपनीत त्यांना ऑफर मिळाली. त्यात ३६ लाखांचे पॅकेज होते. ती नोकरी सोडून युपीएससीची वाट त्यांनी धरली.
2 / 5
अविनाश कुमार : नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील बधवा गावातील अविनाश कुमार. त्यांना युपीएससी 2022 मध्ये 17वी रँक मिळाली. अविनाश कुमार यांनी इंजिनिअरींग केले. त्यांना पश्चिम बंगालमधील विद्युत कंपनीत नोकरी मिळाली. परंतु ती सोडून त्यांनी आयएएस होणे स्वीकारले.
3 / 5
राम सब्बनवार : पुणे येथून राम सब्बनवार यांनी इंजिनिअरींग केले. त्यानंतर 2022 मध्ये युपी केडर घेऊन आयएएस झाले. त्यांनी गुगलमधून इटर्नशिप केली होती. परंतु युपीएससीला जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच प्रयत्नात त्यांना 202 वी रँक मिळाली.
4 / 5
रुशाली कलेर : पंजाबमधील जालंधर येथे राहणारी रुशाली कलेर यांनी युपीएससी 2022 मध्ये 492वी रँक मिळवली. त्यांनी पंजाब इंजिनियरिंग कॉलेजमधून बीटेक केले. त्यानंतर दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससीमध्ये यश मिळवले.
5 / 5
सिमी करण : युपीएससी सिव्हील सर्व्हीसमध्ये यश मिळवणारी सिमी करण यांनी मुंबई आयआयटीमधून 2019 मध्ये बीटेक केले. त्यानंतर संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले.