Assam Flood: आसाममध्ये पुराचा हाहाकार… ; 28 जिल्ह्यांतील 2930 गावांतील19 लाख बाधित
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आसाममधील पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी फोन केला असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.
1 / 10
आसाम राज्यात मुसळधार पावसामुळे पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांतील 2930 गावांतील 19 लाख लोक पुरामुळे बेघर झाले आहेत.
2 / 10
काल (शुक्रवार) पासून सुरु असलेल्या पावसात दोन मुलांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विभागाकडून राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3 / 10
आसामममधील पूरग्रस्त भागातील पुराच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत असून लोकांची घरे पाण्याखाली जात आहेत. राज्यातील परिस्थिती बिकट असून आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाल्याचे पूरग्रस्तांचे म्हणणे आहे.
4 / 10
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आसाममधील पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी फोन केला असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.
5 / 10
या नैसर्गिक आपत्तीमुळे जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली असून, पंतप्रधानांनी राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.असेही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.
6 / 10
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, दारंग जिल्ह्यातील सिपझार भागात पुरामुळे NH-15 पाण्याखाली गेला आहे. दारंग जिल्हा प्रशासनाने महामार्गावरील वाहनांची वाहतूक बंद केल्याने शेकडो ट्रक तेथे अडकून पडले आहेत.
7 / 10
दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर येऊन 13 बंधारे, 64 रस्ते आणि पूल खराब झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
8 / 10
मुसळधार पाऊस व पुरामुळे राज्यातील बजली जिल्हाला सर्वाधिक फाटका बसला आहे. येथील पुरामुळे एकूण 3.55 लाख लोक बाधित झाल्याची मी, माहिती समोर येत आहे
9 / 10
पूरग्रस्त भागातील एक लाखाहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. दुसरीकडे पुरामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
10 / 10
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ईशान्य रेल्वेच्या लुमडिंग विभागातील जमुनामुख आणि जुगीजन विभागांदरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.