
हवामानातील बदलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. लोकांना सहसा सर्दी आणि फ्लूच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी सवयी देखील अंगीकारू शकता. ज्यामुळे बदलत्या ऋतूनुसार होणारे आजार टाळता येतील.

हायड्रेटेड रहा - दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. प्रत्येक व्यक्तीन दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तसेच तुम्ही ग्रीन टी अथवा नारळ पाणी देखील पिऊ शकता. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

ॲक्टिव्ह रहा - नियमितपणे व्यायाम किंवा योगासने करा. तसेच निरोगी व पौष्टिक नाश्ता करा, आहार घ्या. फळांचे सेवन करा. थोडावेळ उन्हात बसा, त्यामुळे नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळेल. तुम्ही काही वेळ चालायला जाऊ शकता, यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह रहाल.

चांगली झोप महत्वाची - निरोगी राहण्यासाठी, चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही व फ्रेश वाटतं. चांगल्या व शांत झोपेमुळे निरोगी राहण्यासही मदत होते.

संतुलित आहार - आहार व आरोग्याचा घनिष्ट संबंध असतो. तुम्ही आहारात अ, क, ड आणि ई जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा समावेश करू शकता. झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडने समृध्द असलेल्या पदार्थांचे सेवन हेही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. तसेच आहारात अंडी, इडली, पालक, बीटरूट आणि हंगामी फळांचा समावेश करा.