अमिताभपासून ते अंबानींपर्यंत… देशातील 10 महागडी घरं माहीत आहेत काय?; किंमत कोट्यवधी…

भारतातील सर्वाधिक महागडी आणि अलिशान घरं पुन्हा चर्चेत आली आहेत. मुकेश अंबानी यांच्या अँटालियापासून ते अमिताभ बच्चन यांच्या जलसा ते शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यापर्यंतचा यात समावेश आहे. देशातील ही दहा महागडी आणि अलिशान घरे आहेत. पाहताच क्षणी डोळे दिपून जातील इतकी अलिशान घरे आहेत. उद्योगपती आणि सेलिब्रिटिंचीही घरे आहेत. मुंबई आणि देशातील विविध भागात ही घरे आहेत.

| Updated on: Apr 04, 2024 | 3:15 PM
मुकेश अंबानी - अँटालिया  सर्वात महागड्या घरांच्या यादीत अब्जाधीश आणि देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतील हे त्यांचं घर 27 मजल्यांचं आहे. अँटालिया असं या बंगल्याचं नाव असून 15व्या शतकातील स्पॅनिश आयलँडवरून हे नाव ठेवण्यात आलं आहे. या घराची किंमत 1 ते 2 बिलियन डॉलरच्या आसपास आहे. बकिंघम पॅलेसनंतरचं हे जगातील सर्वात महागडं घर आहे.

1 / 9
शाहरुख खान - मन्नत  किंग खान शाहरुख खान याचा मन्नत बंगला हा अरबी समुद्रा शेजारी आहे. वांद्रे येथील या बंगल्याची किंमत 200 कोटीहून अधिक आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान हिने या सहा मजली घराला स्वत:च्या हाताने सजवलं आहे. या घराचे इंटेरिअर अफलातून आहे. जीम, लायब्ररी, स्विमिंग पूल, प्रायव्हेट सिनेमा सर्व काही घरात आहे.

2 / 9
आनंद पीरामल - गुलिता  पीरामल ग्रुपचे चेअरमन अजय पीरामल यांनी मुलगा आनंद पीरामल यांना हे घर गिफ्ट दिलं होतं. आनंद यांचं लग्न मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांच्याशी झालं होतं, तेव्हा हे घर गिफ्ट देण्यात आलं होतं. मुंबईत हे घर असून डायमंड शेपमध्ये बनवण्यात आळं आहे. या घराची किंमत 450 कोटी इतकी आहे. या घरात एक मंदिरही आहे.

3 / 9
कुमार मंगलम बिर्ला - जेटिया हाऊस  मुंबईच्या मलाबार हिल परिसरात जेटिया हाऊस आहे. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा हा बंगला 30 हजार स्क्वेअर फिटाच्या परिसरात वसलेला आहे. या बंगल्याची किंमत 425 कोटी आहे. या घरात 20 बेड रूम आहेत. ओपन कोर्टयार्ड आणि गार्डनही आहे.

4 / 9
गौतम सिंघानिया - जेके हाऊस  ब्रीच कँडी परिसरात उद्योगपती गौतम सिंघानिया यांचं जेके हाऊस आहे. गौमत सिंघानिया रेमंड ग्रुपचे चेअरमन आहेत. या 30 मजली जेके हाऊसची किंमत 6 हजार कोटी आहे. या घरात सर्व आधुनिक सुविधा आहेत. दोन स्विमिंग पूल, पाच पार्किंग फ्लोअर, एक हेलिपॅड, स्पा, जीम आणि होम थिएटर घरात आहे.

5 / 9
रतन टाटा - फेअरलॉन  मुंबईच्या कुलाबामध्ये रतन टाटा यांचा हेरिटेज बंगला आहे. या आयकॉनिक बंगल्यात कोलनिअल आर्किटेक्चर आहे. बंगल्याला जबरदस्त सी व्ह्यू आहे. या बंगल्याची किंमत 150 कोटी आहे. यात स्विमिंग पूल, मीडिया रूम, जीम, सन डेक, लायब्ररी आणि पार्किंगची सुविधा आहे.

6 / 9
विजय मल्ल्या- स्काय मेन्शन  बंगळुरू येथील स्काय मेन्शन सर्वात फेमस आहे. उद्योगपती विजय मल्ल्या यांचा हा बंगला आहे. 40 हजार स्क्वेअर फुटावर हा बंगला आहे. अत्यंत महागडं घर म्हणून या घराकडे पाहिलं जातं. या घरात महागडं इंटेरिअर आहे. इनफिनिटी पूल आहे. या घराची किंमत 100 कोटीच्या जवळपास आहे.

7 / 9
अमिताभ बच्चन - जलसा  बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला जुहू येथे आहे. गेल्या दोन दशकापासून बच्चन कुटुंब येथेच राहते. हा बंगला दोन मजली आहे. या बंगल्यात अमिताभ यांच्यासह जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय आदी राहतात. सत्ते पे सत्ता या सिनेमातील अभिनयाबद्दल निर्माते रमेश सिप्पी यांनी अमिताभ यांना हा बंगला गिफ्टमध्ये दिला होता. या बंगल्याची किंमत 120 कोटी आहे

8 / 9
शशी आणि रवी रुईया- रूईया मेन्शन  नवी दिल्लीतील रुईया मेन्शन प्रसिद्ध उद्योगपती शशी आणि रवी रुईया याचं घर आहे. 2.2 एकरवर असलेल्या या घरात दोन्ही भाऊ राहतात. या घराला कोलोनियल स्टाईलने बनवलं आहे. या घरात सर्व आधुनिक सुविधा आहेत. या बंगल्याची अंदाजित किंमत 92 कोटी इतकी आहे.

9 / 9
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.