बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसलाचा आज वाढदिवस आहे. ती सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
लवकरच दिव्या 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेल्या 1 महिन्यापासून लखनऊमध्ये आहे.
दिव्या 'टी-सीरीज'चे मालक भूषण कुमार यांची पत्नी आहे. तिनं आपला वाढदिवस भूषण यांच्यासोबत 'सत्यमेव जयते 2' च्या सेटवर साजरा केला आहे.
दिव्यानं वाढदिवसाला सुट्टी न घेता संपूर्ण टीमसोबत सेटवरच वाढदिवस साजरा केला आहे.
या सेटवरुन दिव्याच्या वाढदिवसाचे अनेक फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे.
ती यात फार खूश दिसत असून या फोटोला कॅप्शन देताना तिने सर्वांचे आभार मानले आहेत