Marathi News Photo gallery Gachchi of cleanliness erected by bachchu kadu cleanliness of educated z p school
Photo | बच्चू कडूंनी उभारली स्वच्छतेची गुढी, शिक्षण घेतलेल्या z p शाळेची केली स्वच्छता
मराठी वर्षाला आज गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरुवात झाली. त्यामुळे नवीन वर्षात नवीन संकल्पना म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या बेलोरा गावात स्वच्छता अभियान राबविले. आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्या शाळेत गुढीपाडव्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वतः राज्यमंत्री बच्चू कडू यांनी श्रमदान करून स्वच्छता केली आहे.