भारताच्या 2 कॅप्टनची खास लव्हस्टोरी, पहिल्यांदा मैत्री, नंतर प्रेम झालं मग साता-जन्माच्या आणाभाका घेतल्या!
गौतम आणि नेहा दोघेही कर्णधार असल्याने एकमेकांना चांगले ओळखायचे. दोघांनी 2018 साली साखरपुडा केला आणि त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2019 साली लग्न केले. (Gautam Dagar And Neha pardeshi rugby team captain Wedding)
दोघेही कर्णधार असल्याने एकमेकांना चांगले ओळखायचे. दोघांनी 2018 साली साखरपुडा केला आणि त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2019 साली लग्न केले.
Follow us
खेळाच्या दुनियेत अशी अनेक जोडपी आहेत ज्यांचं मैदानावर प्रेम झालं आणि त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्धार केला. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन भारतीय कर्णधारांच्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत, जे एका कॅम्पमध्ये एकमेकांना भेटले, त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते प्रेमातही पडले. चार वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर साता जन्माच्या आणाभाका घेतल्या.
भारतीय रग्बी संघाचा कर्णधार गौतम डागर (Gautam Dagar) आणि महिला संघाची माजी कर्णधार नेहा परदेशी (Neha Pardeshi) हे 2009 पासून एकमेकांना ओळखत होते.वास्तविक, 2015 मध्ये प्रथमच त्यांनी राष्ट्रीय शिबिराच्या (कॅम्प) दरम्यान दोघांचा अधिक संवाद झाला. 15 दिवसानंतर जेव्हा शिबिर संपलं तेव्हा दोघांनाही समजले की दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल ‘खास’ भावना आहे.
दोघांनीही डेट करणं सुरु केलं पण ते अतिबात सोपं नव्हतं. गौतम दिल्लीत राहत होता आणि नेहा पुण्यात राहत होती. दोघेही अगदी क्वचित प्रसंगी भेटू शकायचे. दोघांनी कोणतीही स्पर्धा मिस केली नाही. हीच वेळ होती जेव्हा दोघांना भेटायला मिळायचं, एकत्र जास्त वेळ घालवता यायचा.
2015 मध्ये, दोघांनी अल्टिमेट फिटनेस फॅन नावाच्या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरविले जे जवळजवळ तीन आठवडे चालणार होते. त्याची अंतिम फेरी मुंबईत होणार होती जिथे त्यांना भेटता येणार होतं. नेहा दुसऱ्या फेरीत बाद झाली. बाहेर पडल्यानंतर गौतमलाही स्पर्धेतून बाहेर पडावेसे वाटत होते पण नेहाने त्याला असं करणयास नकार दिला. गौतमने ही स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर दोघांनी मोठी सुट्टी एकमेकांसोबत घालवली.
दोघेही कर्णधार असल्याने एकमेकांना चांगले ओळखायचे. दोघांनी 2018 साली साखरपुडा केला आणि त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 2019 साली लग्न केले.