'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून गौतमी देशपांडेनं महाराष्ट्राच्या घराघरांत आपलं स्थान बनवलं आहे.
सई आणि आदित्यची लव्हस्टोरी दिवसेंदिवस अधिक रंजक होतेय.
आता तर हे दोघं एक दील दो जान झाले आहेत. लवकरच ते विवाहबंधनात कसे अडकतात हे पाहण्याची रसिकांना उत्सुकता लागलीय.
अशात आता गौतमीनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.