'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.
गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे नवनवीन आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.
गेले अनेक दिवस गायत्री वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. आता तिनं निळ्या आणि काळ्या रंगाच्या थिमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
गायत्री या अंदाजात एकदम हटके दिसतेय. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडलाय.
‘I'm a savage...Classy, bougie, ratchet, Yeah!’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.