'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं.
एवढंच नाही तर 'युवा डान्सिंग क्विन'या मालिकेतून प्रेक्षकांना गायत्रीच्या डान्सची झलक पाहायला मिळाली.
गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे नवनवीन आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.
आता तिचे हे पारंपारिक वेशातील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.