
जर्मनीचा प्रसिद्ध आणि दिग्गज गोलकीपर ऑलिव्हर कान 15 वर्षांनी भारतामध्ये आला. मुंबईमधील जी डी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याने भेट दिली.

ऑलिव्हर कानचं या शाळेत पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आल असून शाळेतील मुलांनी त्याच्यासमोरच एक फुटबॉलचा सामनाही खेळला

चिमुकल्यांनी आपल्या हिरोच्या सही जर्सीवर तर कोणी फुटबॉलवर घेतली. आयुष्यभर त्यांच्यासाठी ही एक मोठी आठवण असणार आहे.

ऑलिव्हर काननेही आपल्या चाहत्यांना नाराज केलं नाही, सर्वांना सही देत त्यानंतर मार्गदर्शनही केलं.

भारताने या सुंदर खेळाशी आपली समृद्ध संस्कृती एकरुप करावी. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जागतिक स्तरावरील फुटबॉल या खेळात भारत लवकरच आपलं स्थान निश्चित करेल, असं ऑलिव्हर कान म्हणाला.