आषाढी एकादशीच्या निमित्ताने औरंगाबाद शहरातील आसावरी लिंगाडे नावाच्या मुलीने श्री विठ्ठलाची हुबेहूब मूर्ती रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे.
9 फूट लांबीची ही रांगोळी तब्बल 7 दिवस प्रयत्न करून साकारलेली आहे.
रांगोळीच्या माध्यमातून पंढरपूरची वारी जिवंत करण्याचा अनोखा प्रयत्न या मुलीने केलाय.
या रांगोळीत अगदी हुबेहुब असे विठ्ठलाचे रुप साकारण्यात आले आहे. या रांगोळीमध्ये वारकरीसुद्धा रेखाटण्यात आले आहेत. वारकरी टाळ, मृदंग घेऊन विठ्ठल नामाचा जप करताना आपल्याला दिसत आहेत.
या रांगोळीत श्री विठ्ठलाबरोबर संत तुकाराम, पंढरपूर आणि वारकरी यांचंही चित्र रांगोळीतून रेखाटण्यात आलं आहे.