'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातून देशभरातील रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
आता वर्षा अखेरीस ती मस्त धमाल करत भटकंती करतेय.
या भटकंतीचे काही फोटो तिनं सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रेया प्रचंड स्टायलिश दिसत आहे.
नुकतंच श्रेयानं 'बायकोला हवं तरी काय' या वेब सिरीजमधून वेब सिरीजच्या जगात पाऊल टाकलं आहे.
अभिनेता अनिकेत विश्वासरावसोबत ती 'बायकोला हवं तरी काय' या वेब सिरीजमध्ये झळकली.