क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. भारतीय स्त्रियांवर सावित्रीबाईंच्या कार्याचा सर्वाधिक पगडा असून त्यामुळेच आजच्या दिवशी सगळे त्यांना सॅल्युट करताना दिसत आहेत.
कॅबिनेट मंत्री धनंजयमुंडे यांनी देखिल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे.
पुण्यातील ऐतिहासिक फुले वाड्यात जात मुंडेंनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केलं.
ट्विटरवर फोटो शेअर करत कॅबिनेट मंत्री धनंजयमुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेत त्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी सावित्रीबाईंनी आपलं आयुष्य वेचलेय.