Photo : नागपुरात Devendra Fadnavis यांनी उभारली गुढी, मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी दिल्या शुभेच्छा
नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी नागपुरात गुढी उभारली. ते म्हणाले, गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भगवं तेज अनुभवायला मिळतंय. मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होतोय. नवीन वर्ष सुख समृद्धी, आणि आरोग्यदायी जाओ. यावेळेचं वेगळेपण असं आहे की एकीकडे श्री रामाची मिरवणूक काढत असताना, अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचं प्रत्यक्ष निर्माण वेगाने होत आहे. येत्या काळात नववर्षाचा दिवस श्री रामाच्या सानिध्यात अयोध्येत साजरा करता येईल.
Most Read Stories