वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे.
भर उन्हाळ्यात मात्र गुलमोहर लालबुंद होवून चांगलाच बहरला आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात असलेला गुलमोहर सध्या परभणीकरांचे लक्ष वेधत आहे.
तळपत्या उन्हामुळे शेत शिवारातील वृक्षांची पानझड होत असते.
परंतु अशा अवस्थेत वैशाखात फुलण्याचे वरदान लाभलेला लालेलाल गुलमोहोर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.