बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. 16 नोव्हेंबर 1985 ला त्याचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. त्यानं आतापर्यंत बर्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे, मात्र 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी 2' या चित्रपटापासून त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. आदित्य रॉय कपूरशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
आदित्य हा प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि अभिनेता कुणाल रॉय कपूरचा भाऊ आहे.
लहानपणी आदित्यला क्रिकेटचं फार वेड होतं. मात्र काही काळानंतर त्यानं क्रिकेट खेळणं सोडलं.
आदित्यनं 2009 मध्ये 'लंडन ड्रीम्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
त्यानं आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्याला खास प्रसिद्धी मिळाली ती 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी 2' या चित्रपटातून.
'आशिकी 2' या चित्रपटात आदित्यसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकं गुणगुणतात.
मध्यंतरी आदित्य आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या नात्याबद्दल चर्चा होती. मात्र या दोघांनी कधी याविषयावर वक्तव्य केलं नाही.