PHOTO | सलमानच्या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता ‘जेठालाल’ बनून घराघरांत पोहचलेत दिलीप जोशी!
बॉलिवूड आणि टीव्ही जगताचा सुप्रसिद्ध चेहरा दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आपल्या धमाल कॉमेडीने लोकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते बर्याच टीव्ही मालिकांचा एक भाग देखील होते.
1 / 8
बॉलिवूड आणि टीव्ही जगताचा सुप्रसिद्ध चेहरा दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आपल्या धमाल कॉमेडीने लोकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते बर्याच टीव्ही मालिकांचा एक भाग देखील होते. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील ‘जेठालाल’ या भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. अभिनेते दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे 1968 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला होता. आज (26 मे) दिलीप जोशी आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2 / 8
अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात बरेच संघर्ष पाहिले. त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्येही छोट्या छोट्या भूमिका ककेल्या. मोठमोठ्या चित्रपटांत काम करूनही त्यांना विशेष नाव मिळू शकले नाही. पण ‘जेठालाल’ने कधीच आशा सोडली नाही. ते थिएटरमध्ये काम करू लागले.
3 / 8
2008 मध्ये दिलीप जोशी यांचे मित्र असित कुमार मोदी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बनवत होते. यापूर्वी दोघांनीही एकत्र काम केले होते. अशा परिस्थितीत असित मोदींनी दिलीप जोशी यांना ‘चंपकलाल’च्या भूमिकेची ऑफर दिली.
4 / 8
तथापि, त्यावेळी असित मोदींना वाटले की, दिलीप ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकणार नाही. यावर त्यांनी दिलीपशी मनमोकळेपणाने बोलणे केले आणि म्हटले की, कदाचित वयोवृद्ध माणसाची भूमिका तुला नीट साकारता येणार नाही. पण ते चंपकलालच्या मुलाची म्हणजेच ‘जेठालाल’ची भूमिका करू शकतात.
5 / 8
अशाप्रकारे दिलीप जोशी यांना या मालिकेतलं एक असं पात्र मिळालं, ज्यासाठी ते आजही ओळखले जातात आणि या पात्राने त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळवून दिले आहेत. मालिकेत आजही ‘जेठालाल’ या पात्राला विशेष पसंती दिली जाते.
6 / 8
दिलीप जोशी यांनी 1989 साली 'मैंने प्यार किया है' या चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘खिलाडी 420’, ‘हमराज’, ‘फिराक’, ‘whats Your Rashee’ आणि ‘जागते रहो’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
7 / 8
टेलिव्हिजनकडे वळताना त्यांनी ‘दाल मे काला’, ‘कोरा कागज’, ‘रिश्ते’, ‘सीआयडी स्पेशल ब्युरो’, ‘हम सब बाराती’, ‘एफआयआर’ आणि ‘अगडम बगडम तिगडम’मध्ये काम केले आहे. यानंतर, त्यांनी 2008 पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करण्यास सुरुवात केली.
8 / 8
वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, त्यांचे लग्न मालातुला जोशी यांच्याशी झाले असून त्यांना दोन मुले आहेत. दिलीप जोशी सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहेत.