अभिनेत्री नेहा पेंडसे आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
नेहाचा जन्म मुंबईत झाला. तिने झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून सिनेक्षेत्रात एंट्री घेतली.
आतापर्यंत तिनं मराठी, तेलूगु, तमिळ आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
1999 मध्ये तिनं पहिल्यांदा 'प्यार कोई खेल नही' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.
नेहीनं 'बिग बॉस 12'मध्ये धमाकेदार टास्क पूर्ण करत प्रेक्षकांची मनं जिंकली.
काही दिवसांपूर्वीच ती बॉयफ्रेंड शार्दूल सिंहसोबत विवाहबद्ध झाली आहे. ती नेहमी शार्दूलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतीच ती 'सुरज से मंगल भारी' या चित्रपटात झळकली. मात्र कोरोनामुळे हा चित्रपट जास्त कमाई करू शकला नाही.