Rishi Kapoor | या भूमिकांमुळे नावाजले गेले होते ऋषी कपूर, चाहत्यांनी केलं खूप कौतुक
बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये बहुतांश रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांनी काही अशा संवेदनशील भूमिकाही केल्या ज्यामुळे त्यांचं खूप कौतुक झालं. त्यांच्या जयंतीनिमित्त काही खास भूमिकांबद्दल जाणून घेऊया.
Follow us
ऋषी कपूर हे बॉलीवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले आणि स्वतःची छाप पाडली. कपूर घराण्याचा वारसा असला तरीही त्यांनी त्यांच्या खणखणीत अभिनयाने सर्वांकडून प्रशंसा मिळवली. आज त्यांची जयंती, त्यानिमित्ताने आपण त्यांच्या अशा काही भूमिका जाणून घेऊया, ज्यामुळे ते अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले गेले.
बॉबी – या चित्रपटातून त्यांनी एक हिरो म्हणून पदार्पण केले. ही त्यांच्या जीवनातील खास भूमिकांपैकी एक आहे. कोणताही अनुभव नसताना त्यांनी बॉबीमध्ये उत्तम काम केले होते. आजच्या तरूणाईला देखील या चित्रपटाचे वेड आहे.
मुल्क – हा चित्रपट ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात ऋषी कपूर यांनी भूमिका ज्या पद्धतीने साकारली गेली तीच भूमिका चित्रपटाचा जीव बनली. या चित्रपटात तापसी पन्नू आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत होते.
अग्निपथ – आपण ऋषी कपूर यांना रोमान्स करताना, ॲक्शन फिल्ममध्येही पाहिलं पण खलनायकाच्या भूमिकेत क्वचितच पाहिलं असेल. पण हृतिक रोशनच्या अग्निपथ या चित्रपटात ऋषी कपूर यांची भूमिका नकारात्मक होती. ही भूमिका त्यांनी अप्रतिमरित्या साकारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
दिल्ली 6 – अभिषेक बच्चनची प्रमुख भुमिका असलेल्या या चित्रपटात ऋषी कपूर हे एकतर्फी प्रियकराच्या भूमिकेत होते. ते चित्रपटात रोमान्स करताना दिसत नाहीत पण रोमान्सबद्दल बरंच बोलत होते. चित्रपटातील त्यांची भूमिका फार मोठी नव्हती पण जेवाढ वेळ ते स्क्रीनवर दिसले, त्यामध्ये त्यांनी पडद्यावर त्यांची छाप सोडली.