बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आज तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. सोबतच यामीनं इंडस्ट्रीमध्ये आठ वर्ष पूर्ण केली आहेत.
करियरच्या सुरुवातीपासूनच तिनं बॉलिवूडमध्ये उत्तम काम केलं आहे. तिनं ‘विक्की डोनर’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
त्यानंतर तिनं ‘बाला’, ‘बदलापुर’, ‘काबिल’, ‘सरकार 3’आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.
यामी गौतमनं एका मुलाखतीत चाहत्यांना सांगितलं होतं की तिला आयएएस अधिकारी व्हायचं होतं.
यामीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ‘चांद के पार चलो’, ‘ये प्यार ना होगा कम’ आणि ‘किचन चॅम्पियन सीजन वन’ या शोजमध्ये काम केलं आहे.
तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कन्नड चित्रपट ‘उल्लास उत्साह’मध्ये काम केलं होतं.