नांदेड : उन्हाळी हंगाम म्हणलं की पारंपरिक ज्वारी, गव्हाची काढणी केली की हंगामाच संपुष्टात असेच दरवर्षी चित्र असते. यंदा मात्र, भर उन्हाळ्यातही शिवार हिरवागार होता तर आता पीक कापणीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा 41 अंशावर असताना शेती कामे उरकून घेतली जात आहेत. जिल्ह्यात सध्या करडई पिकाच्या काढणीला वेग आलाय, करडईची कापणी करून यंत्राद्वारे पीक काढणीचे काम सुरू आहे. वाढत्या ऊन्हामुळे शेतीकामे उरकून शेतीमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.