Retro Bikes | खलिजा खल्लास झाला! या किफायतशीर रेट्रो बाईकने केले दिवाणे
Retro Bikes | तुम्ही पण रेट्रो बाईकच्या शोधात आहात का? तर मग या रेट्रो बाईक तुम्ही पाहिल्यात की नाही? भारतात या रॉयल एनफिल्ड तर नंबर एकवर आहेच. पण इतर कंपन्या तुम्हाला माहिती आहे का? किफायतशीर दरात या रेट्रो बाईक तुम्हाला शानदार, दमदार, जानदार प्रवासाचा आनंद नक्की देतील.
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मोटारसायकल तर सर्वांचीच जानदार सवारी आहे. ती सर्वाधिक लोकप्रिय आहे. स्प्लिट सीट डिझाईन, गोल हेडलाईट, गोल साईड बॉक्स एकदम क्लास आहे. यामध्ये डिस्क ब्रेक, एबीएस, फ्युएल इंजेक्शनसारख्या अनेक सारख्या सोयी आहेत. यामध्ये 349cc चे एअर कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे. या बाईकची एक्स शोरुम किंत 1.93 लाख रुपये आहे.
Honda CB350 ही दमदार बाईक नुकतीच लाँच झाली. ही जुन्या होंडा बाईकसारखी दिसते. यामध्ये फुल फेंडर, चंकी सीट, गोल हेडलाईट मिळते. होंडा सीबी 350 मध्ये एक 348cc एअर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे. ते 20.7bhp पॉवर आणि 29Nm चे टॉर्क जेनरेट करते. या बाईकची किंमत 1.99 लाख रुपये आहे.
येज्दी आणि जावा भारतात परतल्या आहेत. येज्दीने सर्वात रेट्रो स्टाईलची बाईक बाजारात उतरवली आहे. यामध्ये रोडस्टर, ऑल ब्लॅक डिझाईन, ट्विन एक्झॉस्ट आणि छोटे वायझर आहे. या कंपनीची ही रेट्रो बाईकची एक्स शोरुम किंमत 2.06 लाख रुपये आहे.
रेट्रो-स्टाईल FZ-X मध्ये एक आर्किटेक्चर टँक आणि एक गोल हेडलाईट देण्यात आला आहे. यामध्ये आधुनिक एलिमेंट्स आणि ट्रॅक्शन कंट्रोल असे फीचर्स आहेत. ही बाईक 1.36 लाख रुपये एक्स-शोरूम की किंमतीत मिळते. ही सर्वात स्वस्त रेट्रो बाईक आहे. यामध्ये 149cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे.
जावा 42 ही पण येज्दीचीच एक मोटारसायकल आहे. यामध्ये बाबर 42 चे डिझाईन, एक मोठा रिअर फेंडर, एक फ्लॅट हँडलबार, एक छोटे वायझर यामुळे त्याला रेट्रो लूक मिळतो. जावा 42 मध्ये एक 294cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. या बाईकची एक्स शोरुम किंमत 1.94 लाख रुपये आहे.