
विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. बऱ्याच भागात तापमान 45 च्या पुढे गेलंय. उष्णतेच्या या लाटेमुळे माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही उष्णाघाताचा धोका वाढलाय.

उकाडा वाढल्याने गेल्या काही दिवसात पाळीव श्वानांना उष्माघाताचं प्रमाण वाढलंय. नागपुरात गेल्या महिनाभरात 300 पेक्षा जास्त श्वान उष्माघाताने आजारी पडले.

हिटस्ट्रोकमुळे यातल्या काही श्वानांचा मृत्यूची झालाय. नागपुरातील व्हेटरनरी रुग्णालयात रोज 10 पेक्षा जास्त पाळीव श्वानांवर उपचार सुरू आहे.

महिनाभरात 300 पेक्षा जास्त श्वानांवर व्हेटरनरी रुग्णालयात उपचार केलेत. अशी माहिती व्हेटरनरी रुग्णालयाचे डीन संदीप आखरे यांनी दिली.

आपल्या श्वानांची काळजी सारेच करतात. त्यामुळं श्वानांना अश्वस्त वाटायला लागले की, ते लगेच रुग्णालयात घेऊन येतात.