Pune Rain | पुण्यातील पावसाचं थैमान दाखवणारे 10 फोटो
पुण्यात काल (बुधवारी) रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शहरात अक्षरशः धुमाकूळ (Pune City Heavy Rains) घातला आहे.
Follow us
पुण्यात काल (बुधवारी) रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शहरात अक्षरशः धुमाकूळ (Pune City Heavy Rains) घातला आहे.
मुसळधार पावसामुळे शहरातील बरेचसे रस्ते जलमय झाले असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे.
अरणेश्वर भागात पाच जणांचे मृतदेह आढळले असून तीन ते चार जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर सिंहगड परिसरात कारमध्ये एकाचा मृतदेह आढळला.
अरण्येश्वर परिसरातील एका इमारतीची पार्किंगची जागा पूर्ण बुडाली, त्यामुळे आतील गाड्यांच्या अवस्थेबद्दल न बोललेले बरं
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
शिवाजीनगरमधील सिमला ऑफिस चौकामध्ये मुसळधार पावसामध्ये स्विफ्ट आणि एका रिक्षावर झाड पडून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत
वारजे ब्रिजखाली पाणी शिरल्यामुळे वारजे ते कोथरुड रस्ता बंद.
सहकारनगर तळजाईला जाणारा रस्ता नाला फुटल्यामुळे ब्लॉक झाला आहे.