Hero Centennial: हिरो कंपनीची स्पेशल बाइक, घेण्यासाठी या अटी, बनवल्या फक्त 100 गाड्या, विक्री अशी होणार

| Updated on: Jul 01, 2024 | 2:52 PM

देशातील लोकप्रिय ठरलेल्या मोटारसायकलींमध्ये आघाडीवर असलेल्या हिरो कंपनीने स्पेशल बाइक बनवली आहे. हिरो मोटोकॉर्पचे संस्थापक बृजमोहन लाल मुंजाल यांच्या 101 जम्नदिनानिमित्त कार्बन फायबरने तयार झालेली ही बाइक आहे. या बाइकचे केवळ 100 युनिट्सची विक्री काही जणांना होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यांपासून तिची डिलेव्हरी देण्यात येणार आहे.

1 / 5
हिरो मोटोकॉर्पने आज स्पेशल एडिशन मोटारसायकल Centennial आणली आहे. ही बाइक जानेवारी महिन्यात हिरो वर्ल्ड इव्हेंटमध्ये सादर करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीने बाजारात दोन नवीन मॉडल Xtreme 125R आणि हार्ले डेविडसनवर बेस्ड Mavrick 440 लॉन्च केले होते.

2 / 5
हिरो मोटोकॉर्पने ही गाडी कंपनीचे संस्थापक बृजमोहन लाल मुंजाल यांच्या 101 जम्नदिनानिमित्त लॉन्च केली. ही बाईक कंपनीचे कर्मचारी, असोसिएट्स, बिजनेस पार्टनर आणि स्टेक होल्डर्स यांनाच दिली जाणार आहे. सर्वसामान्य लोकांना ही गाडी मिळणार नाही.

3 / 5
हिरोच्या स्पेशल बाइकची डिलेव्हरी सप्टेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे. विशेष म्हणजे या गाडीचे केवळ 100 बाजारात आणली आहे. ही गाडी कंपनीचे प्रसिद्ध मॉडल Hero Karizma XMR च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

4 / 5
गाडीत फायबर बॉडी आहे. सिंगल सीटसोबत काही नवीन कंपोनेंट्स आणि फिचर्स या गाडीत दिले आहे. गाडीत फुली एड्जेस्टेबल सस्पेंशन, एक्रोपोविकचा कार्बन फायबर एग्जॉस्ट मफलर दिला आहे. त्यामुळे गाडीचे वजन वाढले आहे.

5 / 5
गाडीचे वजन 158 किलोग्रॅम आहे. ते कंपनीच्या करिज्मा या गाडीच्या तुलनेत 5.5 किलोग्रॅम जास्त आहे. कंपनीने या गाडीसाठी MRF टायर्सचा वापर केला आहे. ही गाडी फक्त 100 जणांना देण्यात येणार असल्यामुळे तिची किंमत निश्चित केली नाही. लिलावाद्वारे तिची विक्री होणार आहे.