अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेल्या संस्कारी सुनेच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.
मालिकेनंतर हिना खानने रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला. सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणाऱ्या हिनाने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळत आहे.
मात्र या फोटोंमुळे हिनाला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. जर असेच कपडे घालायचे होते तर उमराह करायला जायची काय गरज होती, असा सवाल संतप्त नेटकऱ्यांनी केला.
या फोटोंमध्ये हिनाने लाल रंगाचा नेटेड बॅकलेस ड्रेस परिधान केल्याचं पहायला मिळत आहेत. हा ड्रेस बराच ट्रान्सपरंट आहे. या बोल्ड लूकमुळेच तिच्यावर नेटकऱ्यांकडून टीका होत आहे.
'रमजानच्या महिन्यात असे कपडे घातले आहेस, अल्लाह तुला कधीच माफ करणार नाही', असं एकाने लिहिलंय, तर 'उमराहला गेल्याचा काहीच फायदा नाही', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'लाज बाळग, आताच उमराह करून आलीस' असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
हिना खान नुकतीच उमराह करण्यासाठी मक्काला गेली होती. त्यावेळी तिने बरेच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. त्यावरूनही हिनाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.