'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.एवढंच नाही तर तिनं 'बिग बॉस 11'मध्येसुद्धा हजेरी लावली. बिग बॉसच्या घरात तिनं दमदार प्रदर्शन केलं.
सध्या हीना नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. आता तिनं या नव्या लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
सध्या हीना तिच्या फॅशन सेन्समुळे आणि फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.
हीना रोज नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांसाठी शेअर करत असते.