अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून अक्षराच्या रुपात हीना घराघरात पोहोचली.
त्यानंतर तिनं बिग बॉसमध्ये सुद्धा दमदार कामगिरी केली.
नेहमीच नवनवीन फोटोशूट करणाऱ्या हीनानं आता इंडियन अवतारात फोटोशूट केलं आहे.
जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे. या रुपात हीना कमालीची सुंदर दिसतेय.
जांभळा लेहेंगा आणि मोत्याची ज्वेलरी एकूणच हीनाचा हा लूक चाहत्यांना भुरळ पाडतोय.