PHOTO : कुठे कोरोनासूर, कुठे हिंगणघाटचा हैवान, राज्यात होळीचा उत्साह
राज्यभरात आज (9 मार्च) मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला (Holi 2020) जातो.
Follow us
राज्यभरात आज (9 मार्च) मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा (Holi 2020) केला जातो.
कोकणात होळीला शिमगा म्हणून ओळखले जाते. होळी साजरी करण्याची वेगवेगळी प्रथा-परंपरा आहे.
एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णुचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने होलिकादेवतेचा श्रीविष्णूने वध केला होता.
होलिकाला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही. पण प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. यातून प्रल्हाद बचावला आणि होलिकेचे दहन झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
मुंबईत ठिकठिकाणी अनेक सामाजिक विषयांवर होळी करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचीही होळी करण्यात आली आहे. त्याला कोरोनासूर असे नावही दिले आहे.
वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला फाशी दिली जावी असा संदेशही वरळीतील होळीतून दिला (Holi 2020) आहे.