बॉलिवूड गायिका नेहा कक्कर मस्त होळीचा आनंद लुटताना दिसत आहेत.
कुठलाही सण आला की तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये स्पेशल कार्यक्रम पाहायला मिळतात. आता तुम्हाला होळी स्पेशल कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
तसेच आता ‘इंडियन आयडल’ च्या सेटवरसुद्धा होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
तुमची आवडती गाणी गात हा होळी स्पेशल कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी नेहा कक्करसुद्धा मस्त तयार होत सेटवर पोहोचली आहे.
त्यासाठी नेहा कक्करसुद्धा मस्त तयार होत सेटवर पोहोचली आहे. पांढऱ्या रंगाच्या हटके लेहेंग्यात नेहा कमालीची सुंदर दिसतेय.
नुकतंच नेहानं घरी होळी साजरी करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. या व्हिडीओमध्ये नेहा संपूर्ण कुटुंबासोबत धमाल करताना दिसली.
स्पर्धकांनी गाण्याची जुगलबंदी केली. गाणी गात त्यांनी या स्पेशल एपिसोडमध्ये धमाल केली.
यावेळी नेहानं मस्त फोटोशूट केलं. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.