'बालिका वधू' मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर हिचा नवा लूक समोर आला आहे.
आता ती रोज नवनवीन लूक फोटो शेअर करत असते. आता तिचा हा हटके लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.
‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौर हिने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली.
तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे. मात्र करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अखेर, ‘फॅट टू फिट’ चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं.
आता तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करतोय.