‘उतरन’ या मालिकेतून घराघरात आपली एक वेगळी जागा निर्माण केलेली तब्बू अर्थात अभिनेत्री रश्मी देसाईचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
मालिकेत साध्या अवतारात झळकलेली रश्मी आता मात्र प्रचंड बोल्ड झाली आहे. नेहमी वेगवेगळ्या अंदाजात ती चाहत्यांसाठी फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
आता रश्मीनं काळ्या रंगाच्या हटके ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची हॉट दिसतेय.
अभिनेत्री रश्मी देसाईनं ‘ये लम्हे जुदाई के’ या मालिकेतून मालिका क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. तर 2006 मध्ये रीलीज झालेल्या रावण या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
रश्मी लवकरच ‘तंदूर’ या वेब सीरीजमध्ये झळकणार आहे. रश्मीनं भोजपूरी इंडस्ट्रीमध्येसुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. एका भोजपूरी फिचर फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.