वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजी करायला दिली. इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र, हा सामना होण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध गायक प्रितम यांच्या संगीत रजनीपासून ते एयरो शो पर्यंतचं आयोजन करण्यात आलं होतं. 15 मिनिटं चालेला हा शो अद्भूत, अद्वितीय असाच होता. नरेंद्र मोदी स्टेडियममधील प्रत्येकजण हा शो पाहताना हरखून गेला होता. याशिवाय पायलटच्या कॉकपिटमधून तर मोदी स्टेडियम अप्रतिम दिसत होता. त्याचे हे काही फोटो...