बोर्डिंग स्टेशन म्हणजे जिथून प्रवाशाला ट्रेनमध्ये चढायचं असतं. जर प्रवासी मूळ बोर्डिंग स्टेशनवर पोहोचू शकत नसेल, तर तो दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढू शकतो. यासाठी भारतीय रेल्वेनं बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा दिली आहे. तुम्ही तुमच्या घरातून तुमचं रेल्वे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता.
जर तुम्ही रेल्वे आरक्षण तिकिट बुक केलं असेल आणि शेवटच्या क्षणी बोर्डिंग स्टेशन बदलायचं असेल तर तिकिट काऊंटरवर जाण्याची गरज नाही. तुम्हाला हे घरबसल्याही करता येतं. जरी तुम्ही रेल्वे काऊंटरवरून तिकिट काढलं असलं तरीही तुम्ही बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. तिकिट खरेदी करताना तुमचा मोबाइल नंबर नोंदवायला विसरू नका.
IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 'TransactionType' वर क्लिक करा आणि 'Boarding Point Change' हा पर्याय निवडा. पोर्टल उघडल्यावर तुम्हाला तुमचा PNR नंबर टाकावा लागेल. त्यानंतर चेक बॉक्सवर टिक करा.
रेल्वे चार्ट तयार होण्यापूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची प्रक्रिया केली जाते. तर ट्रेन सुटल्यानंतर 24 तासांच्या आत बोर्डिंग स्टेशन बदललं तर सामान्य परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही. जर ट्रेन रद्द झाली किंवा तीन तासांपेक्षा जास्त उशीर झाला तरच पैसे परत केले जातील.